अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी विलासनगर येथील चाचणी केंद्रावर रॅपिड अॅन्टिजन टेस्ट केली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर तत्काळ आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गुरुवारी रात्री त्यांना हलकासा ताप आल्याने त्यांनी दुस-या दिवशी शुक्रवारी कोरोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. विलासनगर येथील रॅपिड अॅन्टिजन टेस्ट सेंटरमध्ये सकाळी त्यांनी स्वॅब दिलेत, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते असिम्पटोमॅटीक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचे खासगी रुग्णालयात सीटी स्कॅन व एक्सरे करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे. तूर्तास ते गृहविलगीकरणात असून रूग्णालयात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
#Sakal #News #Sakal #ViralNews #Vidarbha #Nagpur #News
टाळेबंदीमुळे सोन्याचे दर अनपेक्षितपणे चाळीस हजारांहून ५८ हजारपर्यंत पोहोचले होते. गेल्या सव्वीस दिवसापासून मात्र दरात सतत घसरण होत आहे. प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दरात ५ हजार २०० रुपयांची घसरण झाली असून आज प्रति दहा ग्रॅम सोने ५१ हजार ५०० इतका दर आहे. शेअर बाजारातही सुधारणा होत असल्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एसटीची चाके थांबलेली होती. पण आता एसटी सुरू होताच लोकांची पावले एसटी बसकडे वळली. ग्रामीण भागांतील फेऱ्या सुरू केल्यानंतर अमरावती-पुणे ही लांब पल्ल्याची बससुद्धा येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने ही बस विनावातानुकूलित असणार आहे. अमरावती-औरंगाबाद हे भाडे ६१० रुपये राहणार असून ज्येष्ठांसाठी अमरावती-पुणेचे भाडे १,०२५ रुपये राहील. या गाडीच्या आरक्षणाला सुरुवात झाली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी केले आहे.

शिक्षकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्यातील ३५ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील ८७५ अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या ४ महिन्यांपासून झालेला नाही. राज्य सरकारक?